पावसाळ्यात ह्या चुका करू नका नाहीतर......
पावसाळा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटणारा ऋतू आहे.अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच या ऋतूचा आस्वाद घेतात. पावसाळा म्हटले कि मुसळधार पाऊस,मस्त गरम चहा आणि गरमागरम भजी, बटाटा वडे अहाहा.... काहींना पावसात चिंब भिजायला आवडते तर काहींना नुसता पाऊस पाहायला आणि त्याचा आवाज ऐकायला आवडतो.लहान मुले तर पावसाळा खूप एन्जॉय करतात. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात उड्या मारणे,ओढे,झरे यात कागदाच्या होड्या बनवून सोडणे,छत्री घेऊन उगाच फेरफटका मारणे,एकमेकांवर पाणी उडवणे,चिखलात खेळणे,पावसात भिजणे हे आणि बराच काही... नुसती धम्माल. वातावरणातील बदलामुळे या गोष्टी होणे साहजिकच आहे. परंतु या गोष्टी कितपत योग्य आहेत त्यामुळे फायदा होतो कि तोटा ते आपण आज पाहुयात. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पावसाळा कसा आल्हाददायक आहे ते आपण पहिले परंतु या ऋतूत खूप खबरदारी घ्यावी लागते नाहीतर तो आरोग्याचे नुकसानही करू शकतो. पाऊस म्हणजे चिकचिक,चिखल, ओले कपडे,सर्दी- खोकला,ताप हे आणि बराच काही.... पावसाळ्यात वातावरण दमट आणि ओलसर असते त्यामुळे पदार्...