इबोला एक महाभयंकर रोग.

इबोला 

 लक्षणे:-



  • रुग्णाच्या शरीरात विषाणू शिरल्यानंतर २-२० दिवसात या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
  •  सुरवातीला खूप ताप  येतो,अंग दुखते,डोके ठणकते,घास दुखतो 
  • उलट्या आणि जुलाब सुरु होतात 
  • अंगावर पुरळ येतात आणि त्याचे मोठे फोड बनतात हे फोड रक्ताने भरलेले असतात . 
  • नाकातोंडाद्वारे,लघवीतून ,शौचातून रक्तस्त्राव सुरु होतो . 
  • रक्तस्तवामुळे रुग्णाची मूत्रपिंडे काम करेनाशी होतात 
  • त्याच्या यकृतावर देखील गंभीर परिणाम होऊन त्यावर सूज येते
  • उपचाराअभावी अथवा उशीर झाल्यास रुग्ण हमखास मृत्युमुखी पडतो 

कोठे सापडला :-

१९७६ मध्ये एंझारा (सुदान)आणि यांबुकु(कांगो प्रजासत्ताक) येथे प्रथम इबोला प्रादुर्भाव झालेल्या गावातील इबोला नदीच्या नावावरून विषाणूला इबोला हे नाव देण्यात आहे. इबोला व्हायरस  डिसीज (एव्हिडी ) याला पूर्वी इबोला हिमरेजिक फिवर  या नावाने ओळखला  जात असे. 


इबोला व्हायरसबद्दल 



फिलोव्हिरीडी कुळातील तीनपैकी एक प्रजात हि इबोला व्हायरस आहे. 

१.बुंदीबुग्यो इबोला व्हायरस(BDBV) 

२. झायरे इबोला व्हायरस(EBOV) 

३.सुदान इबोला व्हायरस(SUDV) 

४. रेस्टोन इबोला व्हायरस(RESTV) 

५.ताय फॉरेस्ट इबोला व्हायरस (TAFV).

यापैकी पहिल्या तीन जाती आफ्रिकेतील प्रादुर्भावासाठी कारणीभूत होत्या. 

  • RESTV हि जात फिलिपिन्स व चीन प्रजासत्ताक येथे  होती. हा लक्षणविरहित असून माकडे आणि वराहाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीमध्ये याचा प्रादुर्भाव होतो. या विषाणूमुळे आजार किंवा मृत्यूची नोंद झालेली  नाही.त्यामुळे ही  जात माणसांसाठी कमी धोकादायक मनाली जात असली तरीही अधिक अभ्यास गरजेचा आहे . 
  • मात्र १९९४ पासून EBOV  आणि TAFV  जातीचा उद्रेक चिंपांझी आणि गोऱ्हीला  मधेही आढळला होता. RESTV  चा प्रादुर्भाव फिलिपिन्स येथे मॅकाक माकडामध्ये आढळला. 
  • २००८ मध्ये  RESTV जातीचा प्रादुर्भाव चीन आणि फिलिपिन्स मध्ये जास्त आढळून आला .

प्रसार:-
इबोला प्रादुर्भावग्रस्त प्राण्यांच्या रक्त, अवयव किंवा शरीरातील स्त्रावाच्या  संपर्कात आलेल्या माणसामध्ये प्रादुर्भाव होतो. 

प्रतिबंध आणि नियंत्रण :-



  • सध्या या रोगावर कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही.मात्र प्रादुर्भाव झालेल्या प्राणी आणि माणसांना अन्य प्राणी आणि माणसांपासून वेगळे ठेवत प्रचंड काळजी घावी. 
  • रेस्टोन इबोला विषाणूचा पाळीव प्राण्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड आणि अन्य साबणाच्या साहाय्याने वराह आणि माकडांच्या फार्म मध्ये नियमित स्वच्छता ठेवल्याने विषाणू अकार्यक्षम होतो. 
  • प्रादुर्भावाची शंका येताच त्वरित संपूर्ण जागा वेगळी करून निर्जंतुकीकरण करावे.
  •  अन्य प्राणी आणि माणसे यांचा संपर्क येऊ देऊ नये.
  • प्रशिक्षित व्यक्तीच्या निगराणी मध्ये प्रादुर्भावग्रस्त आणि मृत प्राण्याची विल्हेवाट लावावी.  
  • सर्वसामान्य लक्षणांमुळे माणसांमध्ये इबोला चा प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यामध्ये आढळणे शक्य होत नाही.त्यामुळे उपचारावेळीही हात श्वास आणि अन्य घटकांचा स्वच्छता ठेऊन प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. या वेळी एका तज्ज्ञ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील ६० व्यक्तींना उपचार करते वेळी प्राण गमवावे लागले आहे.
  • इबोला प्रादुर्भावग्रस्त लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे दफन किंवा दहन अत्यंत काळजीपूर्वक करावे. 
  • अशा प्रादुर्भावग्रस्त परिसरांमध्ये मांस,दुध,चांगले शिजवल्याशिवाय किंवा उखळल्याशिवाय  वापरू नये. 
  • लॅब मध्ये रक्त तपासले असता पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स ची संख्या कमी आढळते. 
  • सध्या या रोगावर कोणताही इलाज नसला तरी अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने मॅप बायोफार्मास्युटिकल कंपनीने झेडमॅप हे प्रायोगिक औषध तयार केले आहे आणि ते तीन डोस मध्ये बनवण्यात आले आहे. 


२०१४ मध्ये इबोला प्रादुर्भावामुळे तीन देशात ६० ठिकाणांहून १३२३ प्रकरणे आणि ७२९ मृत्यू झाले आहेत.पूर्वी झालेला प्रादुर्भाव हा ग्रामीण व दुर्गम ठिकाणी झाला होता मात्र यावेळी एअरपोर्ट असलेल्या फ्रीटाऊन(सिएरा लिऑन ),मोनोबिया(लायबेरिया) आणि कोनार्की (गयाना)  यासारख्या शहरात आढळला आहे.यामुळे रोगाच्या प्रसाराचा धोका प्रचंड वाढला आहे . 


Reference:-आरोग्य विभाग संपूर्ण तांत्रिक ठोकला -प्रा.प्रकाश भद्रे,दर. मंथन दांरांचे,वंदना सूर्यवंशी.     

Comments

Popular posts from this blog

ABOUT PATHOLOGY LABORATORY.....

IMPORTANCE OF RENAL/KIDNEY FUNCTION TEST(RFT)

हि लक्षणे दिसत आहेत तर सावध व्हा.